जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमंती वाढल्या

 जीएसटीमुळे गणेशमूर्तीच्या किमंती वाढल्या 


पनवेल दि.१० ( वार्ताहर ) : कानाकोपऱ्यात बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहेत. लवकरच घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. यासाठीची लगबग मूर्तिशाळांमध्ये सुरू आहे. मात्र, यंदा कच्चा मालावर जीएसटी आकारला जाणार असल्याने गणेशमूर्तीच्या किमंती ३० टक्क्यांनी वाढल्या झाल्या आहेत.

           महाराष्ट्रासह कोकणात घरोघरी गणेशमूर्ती स्थापन करण्याची प्रथा आहे. यामुळे या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. पनवेल पालिका क्षेत्रात देखील जवळपास दोनशेहून अधिक गणेशमूर्ती विक्री केंद्र आहेत. या मूर्तिशाळांमध्ये अक्षय्य तृतियेनंतरच माती भिजवून मूर्ती कामाला सुरुवात होते. तर काहीजणगणेश विसर्जनाच्या दिवशीच पहिली मूर्ती बनवून नवीन वर्षीचे काम सुरू करतात.मात्र, सध्या सतत वाढणारे इंधनाचे दरांमुळे वाढलेला वाहतूक खर्च, वाढलेली मजुरीसोबतच आता कच्चामालावर जीएसटी आकारला जाणार असल्याने माती, पिओपी, काथ्या, रंग तसेच सजावटीच्या साहित्यातवाढ झाली आहे. परिणामी, यंदा गणेशमूर्ती महागणार असून १५०० ते१७०० ला भेटणारी श्रींची मुर्ती आता २२०० ते २५०० रूपयांवर गेली आहे.ग्राहकांच्या मनासारखी मूर्ती देण्यासाठी लागणारे साचे महाग झाल्याने मूर्तीच्या किमंतीमध्ये वाढ होणार असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा महागाईची झळ बाप्पांच्या आगमनालाही बसणार आहे.


Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image