आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरचे सुयश

 आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरचे सुयश 



पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आंतर महाविद्यालयीन फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरमधील विद्ययार्थ्यांच्या तीन संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या तीनही संघांनी चमकदार कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
          या तीनही संघाचे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, पुणे विभाग सहाय्यक अधिकारी शंकर पवार, यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्या राज अलोनी, क्रीडा प्रशिक्षक मंदार मुंबईकर, विशाल फडतरे यांचे यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

   -
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image