पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक महिला बचतगटांनी अर्ज करावेत

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक महिला बचतगटांनी अर्ज करावेत


अलिबाग,दि.18 (जिमाका):-* पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून महिला बचतगटाकडून उपहारगृह चालविण्यात यावेत, असे शासन निर्देश आहेत.

     यानुषंगाने नोंदणीकृत असलेल्या महिला आर्थिक विकास मंडळ व महिला बचतगटाच्या नोंदणीकृत असलेल्या संस्थांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथून बातमी प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसाच्या आत निविदा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य व्ही.डी.टिकोले यांनी केले आहे.