शे.का.प. कळंबोली विभागाची बैठक, "प्रितम म्हात्रे यांनी घेतला पक्ष संघटनेचा आढावा"
पनवेल : 2 ऑगस्ट 2022 चा शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. त्या नुसारच शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल आणि उरण तालुक्यातील पुरोगामी युवक संघटनेच्या युवकांनी विरोधी पक्ष नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंबर कसली आहे. यापुढील होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक मुख्य आणि मोठा घटक म्हणून आपले अस्तित्व यापुढेही राहिले पाहिजे या संदर्भात शेतकरी कामगार पक्षातर्फे विभागवार बैठका घेण्याचे नियोजन केले गेले आहे.