रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी वाय. टी. देशमुख यांची नियुक्ती
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीची बैठक रविवारी (दि. 31) मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. या वेळी वाय. टी. देशमुख यांची संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांना पहिल्यापासूनच या संस्थेचे आकर्षण होते. त्यांचे शिक्षणही याच संस्थेतून झाले आहे. त्यामुळे या नामांकित संस्थेत काम करण्याची त्यांची इच्छा होती. ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण करीत ‘रयत’मध्येही त्यांना सहकारी करून घेतले आहे. या नियुक्तीबद्दल ‘रयत’च्या पदाधिकार्यांकडून देशमुख यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.