विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकासकामांसाठी शासन पाठीशीजनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 

            पुणे दि.२: पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहीलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊसअतिवृष्टीपीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणेविभागीय आयुक्त सौरभ रावविविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेपूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरडप्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावीअसे त्यांनी सांगितले.

पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

            मुख्यमंत्र्यांनी विभागातील पेरणीपीक कर्जवाटपबी - बियाणे आणि खतांची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कृषि निविष्ठांची कमतरता भासू देऊ नये आणि निकृष्ट बियाण्यांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवावे. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, याकडेही लक्ष द्यावे. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात याव्या. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर बैठका घेण्यात याव्यातअसे निर्देशही त्यांनी दिले.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image