योजनाच्या माहिती फलकाचे उद्घाटन

 योजनाच्या माहिती फलकाचे उद्घाटन


नवीन पनवेल : महसूल दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख तथा तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते संजय गांधी योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाच्या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संगायो नायब तहसीलदार विनोद लचके, महसूल नायब तहसीलदार राहुल सुर्यवंशी, एकनाथ नाईकपुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे, अव्वल कारकून सुभाष राठोड, अव्वल कारकून अर्चना घरत, संतोष पाटील, मंडळ अधिकारीतलाठी, महसूल सहाय्यक, कोतवालशिपाई हे या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित होते.

        या फलकामुळे कोणते कोणते कागद जोडायचे याबाबत  अर्जदारांना त्रास होत होतात्याचबरोबर तलाठी यांना सुद्धा वारंवार लाभार्थ्यांना माहिती द्यावी लागत होतीतो वेळ वाचेल व आता कमीत कमी माहिती द्यावी लागेल.