अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अलिबाग, दि.1 (जिमाका):- साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

     यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.