“हर घर तिरंगा” मोहिमेसाठी जिल्ह्याचे संकेतस्थळ कार्यान्वित- मोहिमेत मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन
अलिबाग, दि.21 (जिमाका):- लोकसहभागातून “हर घर तिरंगा” मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ https://www.harghartirangaraigad.in/ कार्यान्वित करण्यात आले आहे.
“हर घर तिरंगा” मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून स्वत:ची नोंदणी, ध्वज विक्रेते/विक्रेत्यांची नोंदणी, मोहिमेसाठी ध्वज देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची नोंदणी करता येणार आहे.
तरी सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विक्रेते, ध्वज देणगीदार यांनी पोर्टलवर मोठ्या संख्येने नोंदणी करावी. जेणेकरून ध्वज खरेदी, वितरणाचे पुढील आवश्यक ते नियोजन जिल्हा प्रशासनास करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.