तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

 

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत घर क्र. 137, 138, 141, 146 गणराज बारच्या बाजुला, से. 22, तुर्भेगांव येथे सुमारे 25.00 मी. X 12.50 मी. मोजमापाचे तळमजल्याच्या कॉलमचे R.C.C. अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता सुरु होते.

या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होतीपरंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होतेया अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे तुर्भे विभागांतर्गत सायन-पनवेल हायवे ब्रीज खाली, सानपाडा, नवी मुंबई येथील बेघर नागरिक / भिकारी देखील हटविण्यात आलेले आहे.

सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. ‍तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार देखील तैनात ठेवण्यात आलेले होते.

या मोहिमेकरीता 10 मजूर व 01 जे.सी.बी.यांचा वापर करण्यात आलेला आहे. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिकतीव्र करण्यात येईल. 

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image