कामोठे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कॉलोनी फोरमचा सिडकोला आंदोलनाचा इशारा
कामोठे (प्रतिनिधी)-गेल्या काही महिन्यांपासुन कामोठे शहराला अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असुन त्यामूळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामूळे ह्या आठवड्यात कामोठे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा सिडकोविरोधात जन आंदोलन छेडण्याचा इशारा फोरमच्या वतीने देण्यात आला.
तसेच शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक जण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यासाठी कामोठे शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात यावे अणि शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी कॉलोनी फोरमच्या वतीने करण्यात आली.
कामोठे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सिडकोच्या वतीने सुरु असुन पुढील आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचे सिडको अभियंत्यांनी सांगितले.
ह्यावेळी कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, समन्वयक रंजना सडोलीकर, अरुण जाधव, डॉ. सखाराम गारळे, राहुल बुधे, डॉ. वसंत राठोड, गीता देसाई कुडाळकर, संजीवनी तोत्रे, शुभांगी खरात, मुक्ता घुगे उपस्थित होते.