जनरल चेकअप शिबिराचे आयोजन

 जनरल चेकअप शिबिराचे आयोजन


पनवेल : ग्रेसफुल हँड्स ट्रस्ट यांच्या वतीने बालग्राम आश्रम येथे जनरल चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे उपस्थित होते. यावेली संस्थेच्या या उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रितम म्हात्रे यानी त्यांचे अभिनंदन केले.

       यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी अरविंद मोरे, डॉ.सविता काळेल, डॉ.सारिका खाडे-पाळसकर, बालग्राम आश्रमातील अधिकारी, कर्मचारी, बालके, संस्थेचे अध्यक्ष सौ.पायल माधोक, अंगना रॉय तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.