मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्या- सय्यद मिनहाज

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्या- सय्यद मिनहाज


बीड (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाचे, अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक ( मुस्लिम,बौद्ध, जैन, सिख,खिश्चन,पारसी व ज्यू ) या समुदायातील गरजु विद्यार्थींकरिता व्यवसायिक, तांत्रिक,मेडिकल या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (उदा  ITI, D.ED, B.ED, MBA, MCA, BSC Agriculture/IT/Nursing, ENGGINEERING, PHARMACY, M.B.B.S, MDS, BDS, BHMS, BUMS, BAMS (Medical, Technical, Managment all Faculties) All Vocational Courses.) online शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2022-23 या वर्षासाठी स्विकारली जात आहे. या योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थींना फायदा व्हावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून संबंधित जिल्हा कार्यालयात  सय्यद इम्रान काद्री

जिल्हा व्यवस्थापक,

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या, बीड/जालना जिल्हा कार्यालय पता रब्बानी मंजिल 2रा मजला रहेमत नगर एस. पी ऑफिस समोर बार्शी रोड बीड.येथे संपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव जमा करा आणि त्वरित शैक्षणिक कर्ज  द.सा.द.शे. 3% ह्या कमी व्याज दरात मिळवा.अधिक माहिती करीता तसेच online अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या  https://mamfdc.maharashtra.gov.in किंवा https://malms.maharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क करावा.असे मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


             

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image