पनवेल शहर शाखेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल शहर शाखेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर


पनवेल (वार्ताहर): -  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर शाखेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. 

याप्रसंगी शिवसेनेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले, तसेच अलीकडील उद्धभवलेल्या परिस्थितीत सर्व शिवसैनिक एकजुटीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे असल्याचे दाखवून दिले. यावेळी एकंदरीत बहात्तर (७२) शिवसैनिकांनी रक्तदान करून योगदान दिले.

यावेळी सदर कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील ,भरत पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम   महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगर संघटक सुनीत ठक्कर, अच्युत मनोरे, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, खारघर शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, शशिकांत डोंगरे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, राहुल गोगटे, सुजन मुसलोंडकर, राहुल टेमघरे, अनिल कुरघोडे, अमर पटवर्धन, संकेत बुटाला, राकेश टेमघरे, राजेंद्र भगत, यतीन मानकामे, कुणाल कुरघोडे, महिला आघाडी संघटिका अर्चना कुळकर्णी, सुनंदा पाटील, उज्वला गावडे, विभाग प्रमुख अमित माळी, प्रदीप माखेजा, चंद्रकांत शिर्के, शाखाप्रमुख शुभम शेखर माळी, संतोष तळेकर, उपशाखा प्रमुख राकेश भगत, तसेच विजय शिंदे, प्रविण धोत्रे, तुलसीदास चिखलेकर, दत्तात्रय फडके,अरुण ठाकूर, युवासेना निखिल भगत, विराज साळवी, विश्वास म्हात्रे, भास्कर पाटील, अमेय ठाकरे, प्रथम ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक वसंत मांडवकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image