कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विशेष कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण

कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्तमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विशेष कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण



 मुंबईदि. २४: मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक साहित्य प्रतिभा लाभलेल्या कवियित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने "हे शब्द रेशमाचे" या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २३ जुलै२०२२ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहविलेपार्ले या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विलेपार्ले मतदार संघाचे आमदार श्री पराग अळवणी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीधर फडकेपुष्कर श्रोत्रीमधुरा वेलणकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिवविद्या वाघमारे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्री. पांडे श्रीराम यांची उपस्थिती होती.

 

            मराठी साहित्य विश्वात शांता शेळके यांनी लेखिकाकवयित्रीअनुवादकसमीक्षा-स्तंभ लेखिकावृत्तपत्र सहसंपादिका इत्यादी माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके यांच्या विपुल व बहुआयामी साहित्यनिर्मितीचा मागोवा घेत त्यांच्या अलौकिक कार्याच्या स्मरणार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रमसांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सादर करण्यात आला . शांता शेळके यांच्या काही कविता व उतारा अभिवाचन अभिनेते पुष्कर श्रोत्री व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. शांताबाईंनी लिहलेल्या गीतांची सुरेल प्रस्तृती या स्वरसोहळयातूनश्रीधर फडकेप्राजक्ता रानडेजय आजगांवकरअर्चना गोरेनचिकेत देसाईसावनी रवींद्रबालकलाकार काव्या खेडेकर व शराण्या साखरदांडे यांनी केली. प्रशांत लळीत यांचे संगीत संयोजन तसेच वैशाली पोतदार यांच्या कथक नृत्याने प्रत्येकांची मने जिंकली. विनीत गोरे यांनी या कार्यक्रमासाठी संयोजन केले. या कार्यक्रमास भरभरून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image