नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय

नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय


पनवेल(प्रतिनिधी) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले.

या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणांमुळे वेगवेगळे पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत, त्या क्षेत्रातील कोणत्या आव्हानांना सामोरे जायाचे आहे, याची माहिती असणे गरजचे आहे. आयुष्यात मार्गदर्शन करणारे खूप असतात मात्र आपण कोणाच मार्गदर्शन घ्यायचे हे महत्त्वाचे आहे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
शिबिरासाठी वरिष्ठ समन्वयक दिपक पाटेकर, शिवव्याखाते, लेखक व करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, रायगड विभाग समन्वयक मंगेश जाधव, सिद्धेश गोसावी यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी आणि एमकेसीएलचे केंद्रातील पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात एमकेसीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक पाटेकर यांनी प्रत्यक्ष कार्यानुभवातून मार्गदर्शन केले, तसेच या वेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आयुक्त गणेश देशमुख यांनी यशस्वी होण्यसाठी हुशार असाव लागत नाही, तर कष्टाळू असणे गरजेचे आहे, असे सांगितले.तर शिवव्याखाते, लेखक व करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांनी शिवाजी महाराज यांच्या पुरंदरचा तह आढवा येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी, यांच्या त्यागातून नुकताचा स्वराज्य लुकलुकतय असा वाटत असताना मिर्जा राजा जयसिंग आला आणि 23 गड त्याच्या झोळीत टाकावे लागले. त्यानंतर औरंगजेबाच्या कैदेत राहावे लागले. राजांच्या या परिस्थीतीला समोर आपले संकट ठेवावे ते संकट सुर्या समोर काजवा असल्या सारखे वाटेल आणि जगण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगितले.



Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image