जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या शिक्षण संकुलांमध्ये आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली
पनवेल (प्रतिनिधीत्व आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी लाखो लोकांना जगण्याची चांगली शिकवण दिली.आपल्या श्री बैठकीच्या माध्यमातून अनेकांचे उध्वस्त संसार त्यांनी पुन्हा बसवले. समाजाला जगण्याची चांगली दिशा दाखवली. आपल्या निसर्गाच्या आवडीतून त्यांनी लाखो झाडे लावून ती वाढवण्याची आणि लोकांमध्ये निसर्गाबद्दल जनजागृती करण्याची त्यांनी शिकवण दिली.
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या शिक्षण संकुलामध्ये *"आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी वृक्ष संवर्धन योजना"* सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये लहान मुलांना निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी या नानासाहेबांच्या शिकवणीतून त्या मुलांच्या वाढदिवशी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेट म्हणून एक छोटे रोपटे देण्यात येणार आहे. हे रोपटे त्या विद्यार्थ्यांनी घराजवळ परिसरात लावायचे आणि त्याचे संगोपन करायचे. वार्षिक परीक्षेच्या वेळी सदर झाडाचा फोटो शाळेमध्ये देऊन छोटे रोपटे लागवड करून त्याच संगोपन केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना शाळेकडून काही गुण देण्यात येतील जेणेकरून त्या मिळणाऱ्या गुणासाठी वर्षभर त्या छोट्याशा रोपट्याचे संगोपन केले जाईल आणि त्या लहान मुलांमध्ये निसर्गाबद्दल जवळीक निर्माण होईल हीच आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना आपल्या सर्वांतर्फे आदरांजली असेल.
कोट
आमच्या सर्व शाळांचे मिळून दोन ते अडीच हजार विद्यार्थी आहेत दरवर्षी एवढी झाडे लावून त्यासोबतच त्यांचे संवर्धन सुद्धा होईल हीच आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली असेल. मी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला सुद्धा विनंती करणार आहे त्यांनी सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचे वृक्ष संवर्धनासाठी काही ठराविक गुण विद्यार्थ्यांना राखून ठेवावे जेणेकरून दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होऊन त्यांचे संवर्धन केले जाईल:-
श्री.प्रितम ज. म्हात्रे
अध्यक्ष, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था