शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीय सेलचा संपूर्ण पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीय सेलचा संपूर्ण पाठिंबा


पनवेल दि.२४ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी पनवेल, नवी मुंबई व मुंबई परिसरातील उत्तर भारतीय सेल, पंजाबच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले तसेच ५५० शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी, पंजाब प्रमुख योगराज शर्मा, वाहतुक सेनेचे सत्ती मारवाह, उत्तर भारतीय सेलचे राष्ट्रीय संघटक राजेश पांडे यांच्यासह अनेक पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आमचा समाज व संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून आगामी सर्व निवडणुकीत आम्ही शिवसेनेच्या भगव्याशी प्रामाणिक राहू असे ठोस आश्वासन दिले तसेच यावेळी उत्तर भारतीय सेलच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली.