उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू संडे ऑपरेशन अंतर्गत 9 मुलांचं ऑपरेशन
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून संडे टू संडे उपक्रमा अंतर्गत 9 चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गोरगरीब विशेषतः आदिवासी भागातील मुलांना गंभीर आजार असतील व या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया करणे सर्वांना शक्य नसते, ही प्रक्रिया खर्चिक असल्याने गोरगरिबांना याचा खर्च परवडण्याजोगा नसतो, त्यामुळे अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून अशा मुलांचा शोध घेऊन, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते, ही शस्त्रक्रिया कॅम्पमध्ये करणे शक्य नसल्याने त्यांना सायन रुग्णालय व ठाण्यातील रुग्णालयात नेण्यात येते. पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात अशा 9 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बाल रुग्ण शल्यचिकित्सक डॉ.संजय ओक, डॉ.राकेश शहा तसेच रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली आहे.