खरीप हंगाम 2022 करिता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा


खरीप हंगाम 2022 करिता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा


     अलिबाग,दि.08 (जिमाका):- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये भात व नागली पिकाकरिता लागू करण्याबाबत शासन निर्णय प्राप्त झाला आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय विमा कंपनी लि. मुंबई ही कंपनी नेमलेली आहे.

     *कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे आहे-*

     *भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम-* रु.51 हजार 760, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर- रु.1 हजार 35.20, अंतिम मुदत- दि.31 जुलै 2022

     *नागली पिकासाठी विमा संरक्षित रक्कम-* रु.20,000/-, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर- रु.400/-, अंतिम मुदत- दि.31 जुलै 2022

     हवामान घटकाचा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामामध्ये हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भू:स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान या बाबींचा समावेश आहे. जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी भात व नागली) योजना ऐच्छिक आहे.

     तरी विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक सी.एस.सी. सेंटर किंवा पीक विमा पोर्टल (https://pmfby gov.in) येथे सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.



Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image