श्री शिवराज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये संपन्न...

 श्री शिवराज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये संपन्न...




पनवेल (प्रतिनिधी)- भारतीय पंचांगा नुसार आज जेष्ठ शुद्ध १३ म्हणजेच, १२ जून २०२२, आजरोजी शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

यंदाच्या राज्याभिषेक प्रसंग म्हणजे शिवराज शक ३४९ प्रारंभ झाला.

याच दिवशी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणी नंतर अधिकृत राज्याची ग्वाव्ही दिली व स्वतः ला अभिषेक करून हिंदुपतपातशहा छत्रपती ही पदवी धारण केली.हाच तमाम भारतवर्षासाठी सुवर्णक्षण म्हणून भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला, याचा समग्र भारतीयांना अभिमान आहे.

परकीय फारसी भाषेतील शब्द  मराठी भाषेत मिसळून मिश्र स्वरूपाची भाषा प्रचलित होती. ही बाब शिवाजी महाराजांच्या लक्षात होती, स्वतंत्र हिंदू राजा म्हणून मराठी भाषेतील मिसळलेले फारसी शब्द काढून टाकण्याचे आदेश तत्कालीन पंडित- अमात्य यांना देऊन, त्यांच्या करवी मराठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला. ही बाब त्याकाळात सामान्य नव्हती.शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे    शिवराज संवत्सर चालू केला त्यामुळे हिंदुस्तानात पुन्हा एकदा हिंदू राजवट चालू करून भारतीयांना आपलेपणाची व स्वतःच्या स्वराज्याची जाणीव करून दिली हेच या प्रसंगाचे गमक होते.

तोच दिवस व त्याच प्रसंगाची आज भारतीय जनमानसाला आठवण करून देण्यासाठी व शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्मृती जागृत राहण्याच्या दृष्टीने आजचा श्री शिव राज्याभिषेक सोहळा पनवेल मध्ये श्री शिवसाह्यद्री संस्थेने आयोजित करून, मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला.

या वेळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अभिषेक सोहळ्यासाठी अनेक दिवस,आमंत्रणे, गाठीभेटी व सोहळ्याच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी मेहनत घेण्यात आली.हा सोहळा पनवेल मधील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आला.यासाठी पनवेल महानगरपालिका ची रीतसर परवानगी व पनवेल शहर पोलीस यांच्या मार्गदर्शक सूचना यांच्यामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यास मदत झाली.

कार्यक्रम सोहळ्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मुख्य अश्वारूढ स्मरकास फुलांची सजावट आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सकाळी ठीक ९.३० वाजता प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी सन्माननीय सौ. चारुशीला घरात मॅडम,माजी उपमहापौर,व सन्माननीय सौ. राजश्री वावेकर मॅडम,नगरसेविका पनवेल महानगरपालिका, यांच्या हस्ते श्री गणेश पूजन , सन्माननीय आमदार श्री बाळाराम पाटील साहेब व सन्माननीय नगरसेवक श्री.प्रथमेश दादा सोमण यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस विधिवत मंत्रोच्चारारसहित  अभिषेक करण्यात आला.या वेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वाना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.याच प्रसंगी पनवेल मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संस्थे तर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालीच्या दुर्ग बांधणी स्पर्धा, निबंध स्पर्धा व संगीत पोवाडा गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .व शेवटी श्री शिव सहयाद्री संस्थेच्या ढोल ताशा ध्वज पथकाच्या महावादनाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .या वेळी संस्थेच्या या सोहळ्यास महत्वपूर्ण मदत व इतर सहकार्य सन्माननीय नगरसेवक श्री गणेश कडू , सन्माननीय शिवसेना संघटक मा. नगरसेवक प्रथमेशदादा सोमण,सन्माननीय नगरसेवक समीर दादा ठाकूर, आणि पनवेल शहर पोलीस यांनी केले.त्याबद्दल संस्था त्यांची कायम ऋणी आहे.

हेमंत हातनोलकर, विशाल धायजे, अभिजित कोकरे,तेजस मोरे,संदेश म्हात्रे,प्राजक्ता बद्रिके,भाग्यश्री परदेशी, निशांत म्हात्रे, समीर जाधव,हनुमान वायभासे,नरेंद्र चाचड व सागर मुंढे यांनी सहभाग घेऊन सोहळ्याची जबाबदारी पार पाडली.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image