शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प
पनवेल दि.०३ (वार्ताहर) : शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परमेश्वराने मनुष्याला दिलेला सुंदर दागिना म्हणजे त्याचे नेत्र होय.त्याची किंमत दृष्टिहीन झालेल्यांना माहीत नसते.सुंदर सृष्टी पाहायची असेल तर सुंदर दुष्टीची आवश्यकता असते त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर मी नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. याच भावनेतूनकळंबोली येथे 55 जणांनी मरणोत्तर नेत्र दान करण्याकरीता संमती पत्र भरून दिले. शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना एक अनोखी भेट दिली. या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या आयुष्यात ज्या दोन डोळ्यांनी साथ केली त्यांना आपल्या नंतरही इतरांच्या उपयोगी पडता येईल. अंध व्यक्तीला ज्या दृष्टीची गरज आहे, अपघातात ज्यांची नजर गेली आहे, किंवा आजारपणाने दृष्टी कायमची क्षीण झाली आहे, त्यांना आपल्या डोळ्यांची फार गरज आहे. उघड्या डोळ्यांनी अशी माणसं आपण पाहतो, त्यांना आपली गरज भागल्यावर मदत करायला हरकत नाही. यासंदर्भात मोठ्या चळवळीची गरज आहे. याबाबत असणारे समज-गैरसमज दूर दूर करून जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे त्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. त्यानुसार कळंबोली येथे बुधवारी रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवाळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यांनी आपले संमती पत्र भरून देऊन महानगर प्रमुखांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी यावेळी प्रबोधन आणि जनजागृती करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कळंबोली येथे नेत्रदान संकल्प शिबिर संपन्न झाले. अशा प्रकारे एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नेत्रदानासाठी संमतीपत्र भरून देण्याची वसाहतीत पहिलीच वेळ आहे. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, पनवेल शहर जिल्हाप्रमुख शिरिष घरत, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगर संघटक प्रथमेश सोमण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट - आजूबाजूच्या परीसराची ओळख करून देणारे,आपल्याला जगाशी जोडणारे ,आत्मविश्वास वाढवणारे आपले डोळे आहेत.जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नसलो तरी काहीतरी देऊन जाण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. त्यामध्ये नेत्रदानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अपरिचित व्यक्तींचे अंधकारमय आयुष्य उजळूण निघेल असा मनाचा निर्धार करून 55 नेत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला . तोही माझ्या वाढदिवसानिमित्त या गोष्टीचा मला मनोमन आनंद. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. या उपक्रमातून यापुढे जास्तीत जास्त नेत्रदान संकल्प करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. - रामदास शेवाळे