आदिवासी समाजामधील पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

 

आदिवासी समाजामधील पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा


अलिबाग,1 (जिमाका) :- आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरिता आदिवासी समाजाच्या  पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि.रायगडमार्फत प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील (जिल्हा रायगड, रत्नागिरी,सिंधुदूर्ग) आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

       या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता नृत्य पथकांनी दि.08 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय, पेण येथे अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता मिळणार आहे.

    प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image