शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित


शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित



अलिबाग, दि.9 (जिमाका) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

    शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास या नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

     या नियंत्रण कक्षामध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही श्री. माने यांनी कळविले आहे.

*नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी पुढीलप्रमाणे:-*

.विभागीय कार्यालय, ठाणे- 8691058094 toqcthanediv@gmail.com

रायगड-  9503175934 dsaoraigad@gmail.com

ठाणे- 7039944689 dsaothane.2013@rediffmail.com

पालघर- 9403821870 dsaopalghar@rediffmail.com

रत्नागिरी-8668972337

dsaortn@rediffmail.com

.सिंधुदूर्ग- 9404305848 saosindhu@gmail.com


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image