पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ लॅब रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू-नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन

पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ लॅब रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू-नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन


पनवेल (प्रतिनिधी)-डाॕक्टर सुभाष सिंग संचलित पनवेल येथील पॅनेशिया हॉस्पिटल मध्ये अद्ययावत कॅथ लॅबचे( catheterization laboratory) उद्घाटन रविवार दिनांक 22 मे रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर आमदार प्रशांत  ठाकूर यांनी आवर्जून उपस्थित राहत डॉक्टर सुभाष सिंग आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

        गेली बावीस वर्ष रुग्णांना अविरत सेवा देणारे पॅनेशिया हॉस्पिटल रुग्ण सेवेतील अद्ययावत आणि कालानुरूप बदलत जाणाऱ्या उपचार पद्धतींचा सातत्याने अवलंब करत आलेले आहे. यापूर्वीदेखील पॅनेसिया हॉस्पिटल मध्ये  कॅथ लॅब फॅसिलिटी उपलब्ध होती. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची तपासणी करणे, गरज पडल्यास त्या ठिकाणी स्टेंट टाकण्याची प्रक्रिया करणे यासाठी कॅथ लॅब ची नितांत आवश्यकता असते.

        पॅनेसिया येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथ लॅब मध्ये अशा शस्त्रक्रिया मेंदू मध्ये देखील केल्या जातील. यापूर्वी अशा शस्त्रक्रियांसाठी पनवेल परिसरातील रुग्णांना नवी मुंबई किंवा मुंबई येथे जावे लागे. एका दिवसामध्ये साधारणपणे 15 ते 16 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची क्षमता नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथ लॅब मध्ये आहे.

      डॉक्टर सुभाष सिंग व पॅनेशिया हॉस्पिटलच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे, शिवसेनेचे  जिल्हा प्रमुख शिरीष घरत, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, बबन विश्वकर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

यापूर्वी देखील आमच्या हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब सुविधा उपलब्ध होती. GE कंपनीच्या मशीनद्वारे आम्ही हृदयाचे आजार असणाऱ्या रुग्णांवरती ऍन्जिओग्राफी, एनजिओप्लास्टी सारख्या प्रोसिजर करत असू. परंतु आता अपग्रेड केलेल्या कॅथ लॅब चे माध्यमातून मेंदूमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक्स काढणे आणि त्या ठिकाणी स्टेंट टाकणे ही प्रक्रिया देखील याठिकाणी होऊ शकणार आहे.रुग्ण सेवा या क्षेत्रांमध्ये जे जे उत्तम अत्युच्च आणि गरजेचे आहे त्या त्या सुविधा पुरवणे यासाठी पॅनेशिया हॉस्पिटल यापूर्वी देखील कटिबद्ध होते व यापुढेही राहील.