लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर 


पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक ३० मे रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविदयालय येथे महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे.
            महिलांमध्ये आढळणारा लठ्ठपणाची तपासणी, आयुर्वेदिक उपचार व आहार- विहार विषयक तज्ञ् डॉ. जाई केणी यांचे मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत हे शिबीर होणार असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराचा जास्तीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा व पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी केले आहे. 
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image