तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथीयांसाठी “पाठ्यवृत्ती”

 

तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथीयांसाठी “पाठ्यवृत्ती”


*इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवाविण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन*


     *अलिबाग,दि.17 (जिमाका):-* भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यात विविध प्रयत्न करीत आहे. तृतीयपंथीयांचे गुरु, दयार यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करीत आहे. एक वर्षे कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे.

     ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7 या गुगल अर्जावरील माहिती भरून अर्ज करावेत. या संदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा अधिक माहितीसाठी श्रीमती साधना गोरे (मो.क्र. 9987773802) यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image