जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक वारसा जपला- लोकनेते रामशेठ ठाकूर

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक वारसा जपला- लोकनेते रामशेठ ठाकूर 




पनवेल (हरेश साठे) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक वारसा जपला आहे, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा ३४ वी पुण्यतिथी कार्यक्रम आज (दि. ०७ मे) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (स्वायत्त) पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. 
         जशी दिवसामागून रात्र, तसा जन्मामागून मृत्यू हा असतोच आणि जन्माला आलेला प्रत्येक माणूस जीवनाचा निश्चय धरूनच वागत असतो. परंतू काही माणसे अमर असतात, कारण त्यांनी आपल्या कार्याने जिव्हाळ्याचे, त्यागाचे अनुभव समाजास दिलेले असतात त्यामुळे ते जनतेच्या स्मरणातुन कधीच लोप पावत नाहीत. आणि ते चांगल्या कार्याची प्रेरणा समाजाला देत राहतात. या विचाराला साजेसे त्यागाचे अमर शिल्प म्हणून स्व. जनार्दन भगत साहेब यांची कायम स्मृती राहिली आहे. आज भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. 
       या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, उपमहापौर सीता पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, नगरसेवक नितीन पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, वसंत पाटील, भार्गव ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका सुशिला घरत, शशिकांत शेळके, अमोघ ठाकूर, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रामशेठ ठाकूर खारघर कॉलेजचे प्राचार्य डॉ. भूपेंद्र गायकवाड, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थासाठी कार्य करणारे स्व.जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करीत आहोत. आणि संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आपण करीत आहोत. रयत शिक्षण संस्था आपली मातृसंस्था आहे. या संस्थेचा आदर्श घेऊन शिक्षण देण्याचे काम होत आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा विस्तार व कारभार वाढला आहे. आपले कॉलेज नामांकनात ए प्लस आहे, याचे कारण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा देण्याचे काम केले आहे. यापुढे अनेक शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आपल्या सर्वाना पेलवायचे आहेत आणि परदेशाप्रमाणे आपल्या येथेही शिक्षण देण्याचे काम झाले पाहिजे, आणि त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. 


  चौकट-
स्व. जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबदद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबदद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उध्दार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत यांच्या अंत:करणात कायम होती. त्यांची शिक्षणाविषयी असणारी प्रचंड आस्था, तळमळ या इच्छापूर्तीच्या उद्देशाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापन करण्यात आली. समाजातून अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होवून ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र निर्माण व्हावा. त्याच प्रमाणे या भागातील सर्वसामान्य गरीब माणसाचा उत्कर्ष व्हावा द्या उदात्त ध्येयाने प्रेरित झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने के.जी ते पि. एच. डी. आणि तत्सम कोर्सेस अशी शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक तत्वातून प्रेरणा घेऊन स्व.जनार्दन भगत यांच्या आशीर्वादाने आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  उत्तम भौतिक सुविधा, उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण यामुळे विद्यार्थाना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था अग्रस्थानी ठरली आहे. 

कोट-
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. त्यांच्या नावाने व आशिर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नाव जगभरात पोहोचले आहे, याचे सर्व श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सर्व सहकाऱ्यांना आहे. भगतसाहेबांनी गव्हाण-पनवेलला मार्गदर्शन करण्याचे काम केले. समाजामध्ये न्याय निवाडा करण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले.  समाजाला दिशा देण्याचे आणि शिक्षण देण्याचे भगतसाहेबांचे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर पूर्ण करीत आहेत.   - अरुणशेठ भगत, अध्यक्ष-जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था 

कोट-
स्पर्धेचे युग व ऑनलाईन शिक्षणामुळे विविध कोर्सेस येत आहेत. त्याचे प्रशिक्षण आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सर्वच शिक्षण संस्थाना स्पर्धेशी तोड द्यावे लागणार आहे. आपली संस्था स्पर्धेच्या युगातही तयार असते. आजवर आपली संस्था सर्वोत्तम शिक्षण देण्याचे काम करीत आली आहे हे अभिमानास्पद आहे.प्रतिभावंत विद्यार्थ्यामुळे आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यामुळे  यापुढेही आपली वाटचाल विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात दर्जेदार व आवश्यक शिक्षण देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत राहू. लोकनेते रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेले आहेत आणि या संस्थेच्या गुणातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वाटचाल सुरु आहे.
    - आमदार प्रशांत ठाकूर 


Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image