सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचे अभिनंदन

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचे अभिनंदन


पनवेल दि.०१ (संजय कदम) : सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आल्याने ०१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पत्रकार संजय कदम उपस्थित होते.  

 पोलिस खात्यामध्ये विविध विभागात कर्तव्य बजावीत असताना त्यांनी केलेली कामगिरी तसेच शरीरसौष्ठव खेळामध्ये त्यांनी २०२१ व २०२२ चा महाराष्ट्र श्री व भारत श्री किताब सलग दोनवेळा मिळविला आहे. तसेच ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये त्याने ८० किलो गटामध्ये ब्रान्झ मेडल मिळवले आहे व सध्या १५ जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या मिस्टर आशिया व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठवाची स्पर्धेची ते तयारी करत असल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. 


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image