आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंचवलीत रस्ते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंचवलीत रस्ते 


पनवेल(प्रतिनिधी) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीतून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. सुमारे १८ लाख रुपयांच्या या विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.

     पनवेल तालुक्यातील चिंचवली ते भानघर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून १० लाख रुपये खर्चून करण्यात आले असून हे काम पूर्ण झाले आहे तसेच आठ लाख रुपयांचा निधी वापरून चिंचवली बसथांबा ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे लोकार्पण व काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात झाले. या शुभारंभावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नीराबाई चौधरी, माजी उपसरपंच रमेश पाटील, चंद्रा पाटील, भानघरचे सरपंच शांताराम पोपेटा, सुनील पाटील, सदस्य अनुराधा वाघमारे, दर्शना चौधरी, मंगला उसाटकर, रमेश पाटील, किशोर पाटील, गजानन पाटील, आत्माराम गवणे, मंगल पाटील, बामा शेळके, प्रकाश शेळके, तुकाराम म्हस्कर, नामदेव डुकरे, समीर गवळी, मयुर तांबडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी, आमच्या गावाच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूप मोठे योगदान दिले, असे सांगून त्यांचे आभार मानले.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image