पनवेलमध्ये वाढतोय वेश्याव्यवसाय

 पनवेलमध्ये वाढतोय वेश्याव्यवसा


नवीन पनवेल : पनवेल शहरात वेश्याव्यवसाय फोफावू लागला आहे. शहरातील आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कल पर्यंत वेश्या दिवसा देखील या ठिकाणी उभ्या असतात. तर कळंबोली येथील खिडूकपाडा जवळील रस्त्यावर उभ्या कंटेनरच्या मागे रात्री मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु आहे. याचा त्रास सामान्य नागरिक तसेच महिलांना होताना दिसत आहे.

              पनवेल शहर तसेच तालुक्यातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे काही गावांमध्ये लोकवस्ती वाढत असताना वेश्यांची वस्ती देखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. पनवेल शहरात शासकीय यंत्रणांच्या नाकावर टिच्चून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे. शहराच्या अनेक गजबजलेल्या भागांत या वेश्या उघडपणे रस्त्यावर गि-हाईक शोधत उभ्या असतात. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहेबस स्थानक परिसरात ह्या वेश्या आपला सावज हेरत असतात तर आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कल पर्यत दिवसा देखील वेश्या व्यवसाय खुलेआम सुरु आहे. अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. तसेच बाजूलाच असणाऱ्या लॉजवर देखील हे गैरप्रकार सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेश्या व्यवसायाचे जाळे पसरत चालले असल्याचे निदर्शनास येत आहे.

             पनवेल शहराच्या अनेक मध्यवर्ती भागात देखील खुलेआम वेशाव्यवसाय सुरु आहे. तर कळंबोली-खिडूकपाडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कंटेनरच्या मागे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सायंकाळी ७ च्या नंतर हा खेळ या ठिकाणी सुरु होतो. अनेक आंबट शौकीन या ठिकाणी उभे असतात. मात्र पोलिसांकडून या प्रकाराकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक ठिकाणी या वारांगना उभ्या असतात. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. शहरात सध्या देहविक्रय व्यवसाय जोरात सुरू आहे. शहराच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी या देहविक्रयातील महिला उघडपणे उभ्या असलेल्या दिसतात. हजार रुपयांत या ठिकाणी सर्वप्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. पोलीस किंवा कुठलीही यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करण्यात स्वारस्य दाखवत नाही. वेश्या भर बाजारात जाऊन अश्लिल चाळे करतातवारंवार पोलिसांकडे तक्रारी करून देखील पोलीस कारवाई करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image