पनवेलमध्ये रंगला धर्मविर सिनेमाचा धडाकेबाज प्रीमिअर, १००० लोकांनी पाहिला मोफत शो

पनवेलमध्ये रंगला धर्मविर सिनेमाचा धडाकेबाज प्रीमिअर, १००० लोकांनी पाहिला मोफत शो



नवीन पनवेल : पनवेल मधील आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना पनवेल महानगर  संघटकमा. नगरसेवक ड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल मधील ओडियन मॉल येथे पीव्हीआर मल्टिप्लेक्स मध्ये धर्मवीर सिनेमाच्या प्रीमिअरचे व मोफत शोचे आयोजन केले होते. यावेळेस स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. शुक्रवारी 13 मे रोजी "धर्मवीर .. मुक्काम पोस्ट ठाणे" हा आनंद दिघे यांच्या जीवनावरील आधारित चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. याचेच औचित्य साधून प्रथमेश सोमण व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चित्रपटाचा धडाकेबाज प्रीमियर आयोजित केला होता.

      आनंद दिघे यांचे २५ फुटी कटआउटओरियन मॉल ला केलेली भगवी रोषणाई व सजावटढोल पथक अशा विविध वैशिष्ट्यांनी ह्या प्रीमियरचा कार्यक्रम पार पडला. ओरियन मॉलमधील पीव्हीआर मल्टिप्लेक्स मधील पूर्ण पाचही स्क्रीनवर त्यादिवशी धर्मवीर चित्रपट एकाच वेळेस दाखवण्यात आला. पनवेल मधील एक हजार नागरिकांना या शो ची मोफत तिकिटे देण्यात आली होती. या कार्यक्रमाला आमदार भरतशेठ गोगावलेजिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटीलजिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार मनोहर भोईरमहापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळउपजिल्हाप्रमुख रामदास पाटीलशिवसेना नेते चंद्रशेखर सोमण इतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व दीड हजाराहून जास्त सामान्य पनवेलकर उपस्थित होते. यावेळेस प्रथमेश सोमण यांचा कार्य अहवाल व आनंद दिघे युवा प्रतिष्ठानची कामे व्हिडिओ स्वरूपात दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तम व रंगतदार नियोजनाबद्दल उपस्थित प्रेक्षकांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचे कौतुक केले. यापूर्वी ठाकरे सिनेमाचे ही असेच प्रीमियर मोफत शोचे आयोजन सोमण यांच्याकडून करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमण यांच्यासह शाखाप्रमुख प्रसाद सोनवणेअभिजीत साखरेअर्जुन परदेशीप्रदीप माखिजायतीन मानकामेअथर्व गोखलेअभिनय सोमणशैलेश जगनाडेतोफीक बागवानअक्षय जोशीअच्युत मनोरेमहिला आघाडीच्या अर्चना कुलकर्णी प्रणाली गावडे तथा धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यानि मेहनत घेतली 

 





Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image