तारकर्ली मालवण बोट दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू-7 जण उपचारार्थ दाखल : उपचारानंतर 11 जण घरी

तारकर्ली मालवण बोट दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू-7 जण उपचारार्थ दाखल : उपचारानंतर 11 जण घरी


सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का): मालवणमधील तारकर्ली येथे जय गजानन नावाची 20 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडून झालेल्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू  झाला. 7 जणांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, 11 जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. *

आकाश भास्करराव देशमुख (वय 30 रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय 41 आळेफाटा पुणे) अशा 2 मृतांची नावे आहेत. रश्मी निशेल कासुल (वय 45 रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे, संतोष यशवंतराव (वय 38 बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत. तसेच मृणाल मनिष यशवंतराव (वय 8), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई. वैभव रामचंद्र सावंत(वय 40 रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय 40 ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

शुभम गजानन कोरगावकर (वय 22) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय 26 रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय 30),  अश्विनी लैलेश परब (वय 30 रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय 40) मनिष यशवंतराव (वय 40) आयुक्तीे यशवंतराव (31 रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णाासो धुमाळे (वय 32), गितांजली धुमाळे (वय 28 रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हा पूर). प्रियन संदिप राडे (वय 14 रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय 31 रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्यात आले आहे. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image