इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना कार्यान्वित

 

इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना कार्यान्वित


अलिबाग, दि.23 (जिमाका) :- समग्र शिक्षांतर्गत इ. 1 ली ते इ. 8 वी मध्ये शिकणारी कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरु केली आहे. इ. 1 ली ते इ. 8 वी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 1 लाख 74 हजार 456 विद्यार्थ्यांना 9 लाख 77 हजार 173 पाठ्यपुस्तके शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत. 

        जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image