मराठा युद्ध स्मारक छात्रा वास म्हणजेच MWM Boy's & Girls hostel Belgaum येथे माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश

मराठा युद्ध स्मारक छात्रा वास म्हणजेच MWM Boy's & Girls hostel Belgaum येथे माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश 



पुणे(प्रतिनिधी)-मराठा युद्ध स्मारक छात्रा वास म्हणजेच MWM Boy's & Girls hostel Belgaum येथे माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. या संधीचा माजी व आजी सैनिकांनी खाली दिलेल्या निवेदनानुसार फायदा घ्यावा. कारण या हॉस्टेल बाबत लिहितांना हात थकत नाहीत व कदाचित पाणेही पुरणार नाहीत.

      मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल हे १९३५मध्ये ब्रिटिश सरकारने मराठ्यांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी व सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी या हॉस्टेल ची निर्मिती करण्याचे काम १९२५ ला सुरू केले व १९३५ ला पहिली बॅच सुरू झाली.बेळगाव येथील प्रथितयश सेंट पॉल या शाळेत हॉस्टेलच्या ३५ मुलांसाठी जागा राखीव ठेवण्यात येत असत. कारण होतं याचं हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांनी सर्व खेळात प्राविण्य मिळवले होते. त्याशिवाय विद्यार्थी सुध्दा मेहनतीने शिकायचे...

      मार्च १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दादर येथील स्कुटर बॉम्ब निकामी करणारे मेजर वसंत लक्ष्मण जाधव साहेब यांचं हॉस्टेल चे माजी विद्यार्थी आहेत. कर्तव्य, मान व सहास ही त्रीसुत्री हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना बाळकडू म्हणून पाजल जात. तेच आयुष्यभर कामी येते व आले.या हॉस्टेल मधील ९० टक्के विद्यार्थी सैन्य दलातील विविध पदांवर कार्यरत होते व आहेत. ५० हून अधिक विद्यार्थी कॅप्टन ते जनरल या पदावर पोहचले आहेत. डॉक्टर मधुकर जगताप, डॉक्टर नेताजी मुळीक, डॉ. शिंदे असे अनेक माजी विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात  नावाजलेले आहेत. डॉ. आर एस पाटील यांनी पीएचडी केली आहे. तर मुंबई महापालिकेचे असिस्टंट कमिशनर म्हणून श्री. विश्वास मोटे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून नावारूपाला आले आहेत. ही यादी फार मोठी आहे. दोन वर्षांपूर्वी याच हॉस्टेल चे विद्यार्थी सुभेदार अजय सावंत यांनी टेंट पेगिंग या घोडेस्वारी प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार पटकावला आहे.महाराष्ट्राला या क्रिडा प्रकारातला पुरस्कार सावंत यांनी मिळवून दिला आहे.

     याच बरोबर १९९०-९१ च्या दरम्यान ले.कर्नल अवस्थी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुलींसाठी हॉस्टेल सुरू करण्यात आले. अल्पावधीतच येथील विद्यार्थीनींनी मेडिकल, इंजिनिअरिंग, एअर होस्टेस, फॅशन डिझायनर अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.याच M W M boys hostel Belgaum येथे शिक्षण घेतलेल्या व पुणे येथे स्थायिक झालेले माजी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामध्ये कर्नल बजरंग सकपाळ साहेब, कर्नल जगदिश गाडेकर साहेब, कर्नल सुभाष सावंत साहेब, कॅप्टन तानाजी पाष्टे साहेब, सुभेदार मेजर महादेव मिसाळ साहेब, श्री. शामराव घराळ साहेब, श्री. हेमंत पवार साहेब, श्री. अनंत राणे साहेब व मी संजय पाटील सहभागी झाले होते.

     हा कार्यक्रम सैन्य दलाच्या आर एस इन्स्टिट्यूट पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात हॉस्टेल येथे एक स्नेह संमेलन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.मराठ्यांच्या शौर्याची गाथा गाणार्या या हॉस्टेल मध्ये प्रत्येक आजी व माजी सैनिकांची, त्यांच्या विधवांची मुले शिकली पाहिजे.




Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image