"महेंद्र घरत" म्हणजे कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता!

"महेंद्र घरत" म्हणजे कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता!



               कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे लढवय्ये कामगार नेते,महेंद्र घरत हे रायगड- नवीमुंबई मधील कामगारांचे आधारवड  म्हणून ओळखले जातात. त्यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा आलेख दिवसेंदिवस चढता आहे. आत्ताच ओल्ड मर्स्क (APMT )मधील कामगारांचा कामगार कपात व पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न त्यांच्या चाणक्ष नेतृत्वामुळे सोडविला गेला. व्यवस्थापनाचा ३५ कामगार कपातीचा डाव हाणून पाडून कामगारांना ७,३००/- रुपयांची पगारवाढ केली. १ मे पासून बंद होत असलेल्या  हिंद टर्मिनल मधील ६०० कामगार हे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ताकदीने लढले व हिंद टर्मिनल व्यवस्थापनाला सर्व कामगारांना ५ कोटी रुपये कायदेशीर देणी देण्यासाठी भाग पाडले . तसेच कंपनी स्वतःहून बंद करत असल्यामुळे कामगारांना केलेल्या सेवेपोटी १५ लाख रुपये गुडविल रक्कम देण्याची मागणी महेंद्र घरत यांनी व्यवस्थापनाकडे केली.
               पंजाब कॉनवेअर मधील स्वयंघोषित कामगार नेते बोंबलून सांगत आहेत की आम्ही कामगारांना न्याय दिला व कंपनी सुरु केली पण वस्तुस्थिती वेगळी आहे. किमान वेतन न देता फक्त ५ ते ८ हजारांवर कामगारांना कामावर बोलवून त्यांना न्याय दिला बोलत असतील तर कामगारांचे दुर्दैव आहे. पंजाब कॉनवेअर मध्ये मुख्य कंत्राटदार GDL आहे व सब कॉन्ट्रॅक्टर GAD लॉजिस्टीक्स आहे. जर पंजाब कॉनवेअर व GDL यांच्यातील करार ३१ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात आला तर कामगारांची कायदेशीर देणी त्यांना मिळालीच पाहिजेत तशी मागणी पहिल्यांदा महेंद्र घरत यांनी दोन्ही कंत्राटदारांकडे केली आहे.
             कामगारनेते महेंद्र घरत हे जसे बोलतात तसे वागतात याची CFS मधील कामगारांना जाणीव आहे व कामगार नेते महेंद्र घरत यांचा कामगारांना आधार वाटत आहे त्यामुळे CFS कामगारांचा ओघ त्यांच्याकडे वाढत आहे.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image