महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन

                                                 

महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन



*पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व आमदार निरंजन डावखरे यांचाही सहभाग*


     *अलिबाग, दि.05 (जिमाका):-* महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 05 आणि 06 एप्रिल 2022 रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच सभागृहातील इतर ज्येष्ठ सदस्य या प्रशिक्षणास उपस्थित आहेत. 

     या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण 110 आमदारांनी नोंदणी केली आहे. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

     या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्यांची व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे असे लोकप्रतिनिधीभिमुख कार्यक्रम होणार आहेत.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image