खारघर आणि तळोजा नोडमधील पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी तसेच टॅंकरच्या मागणीकरिता सिडकोकडून संपर्क साधण्याचे आवाहन

खारघर आणि तळोजा नोडमधील पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी तसेच टॅंकरच्या मागणीकरिता सिडकोकडून संपर्क साधण्याचे आवाहन


खारघर (प्रतिनिधी)- खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टॅंकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉटसअप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. 

     दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, नैना शहर, महागृहनिर्माण योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबईतील खारघर आणि तळोजा नोडला नागरिकांकडून वास्तव्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाण्याची मागणीही वाढत आहे. सद्यस्थितीत सिडकोकडून हेटवणे पाणी पुरवठा योजनेसह नवी मुंबई महानगरापालिका, एमआयडीसी यांच्या मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु या परिसरातील सन 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सिडकोकडून आतापासूनच वाढीव पाणी पुरवठ्यासाठी विविध उपायोजनांचा अवलंब केला जात आहे. यासाठी सिडकोकडून विविध लघुकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.

         याशिवाय तातडीची उपाययोजना म्हणून व नागरीकांच्या विनंतीनुसार सिडकोने पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरील मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिक पाणी पुरवठ्या संदर्भातील तक्रार नोंदवू शकतात. तसेच टॅंकर संदर्भातील मागणीसाठीही नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image