पनवेलमध्ये पुन्हा हातगाडयांचे बस्तान

 पनवेलमध्ये पुन्हा हातगाडयांचे बस्तान



नवीन पनवेल : पनवेल उरणनाका ते टपालनाका येथे  दररोज 20 ते 25 अनधिकृत हातगाड्या लागत आहेयामुळे नित्याच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहेत्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पुन्हा एकदा शहरात हातगाड्या सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र महापालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे बघूनही कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.

              पनवेल शहरात ठिकठिकानी हातगाडी चालकानी बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहेपनवेल शहराची प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या टपाल नाका येथून उरण नाक्यापर्यंत फळे आणि भाज्या विक्री करणाऱ्या हातगाड्या उभ्या असतातया गाड्या पुढे उरण नाक्यावर प्रचंड गर्दी करतातयेथेच मच्छी विक्रेते रस्त्यावर बसलेले असतातरिक्षा थांबा देखील येथेच असल्याने नागरिकांच्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा हॉस्पिटलपर्यंत लागलेल्या असतातत्यामुळे शहरातील या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम असते. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेल परिसर बेकायदा हातगाड्याच्या विळख्यात सापडलेला दिसत आहेरस्त्यावर पुन्हा एकदा हातगाड्या सुरु झाल्या आहेतमात्र अतिक्रमण विरोधी पथक यांच्यावर कारवाई करताना दिसत नसल्याने त्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पनवेल महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुस्त झाली असल्याचे या निमित्ताने दिसत आहे. हातगाड्यांचे शहर ही पुसलेली ओळख पुन्हा पनवेल शहरात डोके वर काढू लागली आहे.  


--

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image