समाजसेवेचे छोटेखानी कार्य सुद्धा मोठ्या कार्यात रूपांतरित होते - वरिष्ठ पोलीस निरिक्षक - रविंद्र दौंडकर;

समाजसेवेचे छोटेखानी कार्य सुद्धा मोठ्या कार्यात रूपांतरित होते - वरिष्ठ पोलीस निरिक्षक - रविंद्र दौंडकर; 

दिलासा फाउंडेशन, पनवेलतर्फे गरजूना शांतीवन येथे सायकलींचे वाटप



पनवेल(प्रतिनिधी) समाजसेवेचे छोटेखानी कार्य सुद्धा मोठे कार्यात रूपांतरित होत असते, त्यामुळे प्रत्येकाने समाजसेवेचा वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी केले. दिलासा फाउंडेशन पनवेल यांच्यातर्फे गरीब व गरजू व्यक्तींना शांतीवन येथे मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शांतीवनचे कार्याध्यक्ष एड. प्रमोद ठाकूर, कार्यवाहक विनायक शिंदे, अनिरुद्ध आदमाने, शांतिवन आश्रमशाळा मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थी व नागरिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
            गरजू नागरिकांना सायकल मिळावी, यासाठी दिलासा फाउंडेशनने नागरिकांना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पाच सायकली जमा झाल्या. या पाच सायकलींचे वाटप शांतीवन येथे करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर व शांतीवनचे एड. प्रमोद ठाकूर यांनी दिलासा फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले व दिलासा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला उपक्रम राबवला असल्याचे आवर्जून नमूद केले.  सायकल ही काळाची गरज असल्याचे एड.प्रमोद ठाकूर यांनी सांगितले. यावेळी मलासुद्धा या उपक्रमात सहभागी करावे, जी काही मदत लागेल ती मी नक्कीच करेन असे रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.
            या कार्यक्रमाला कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवनच्या अध्यक्षा रक्षाताई मेहता यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय राम सफाळे (खैरवाडी), अनुजा निवृत्ती पाटील (वाजेपुर), जान्हवी संदीप पाटील (कळवे), रिया राजाराम घरत (वांगणी), कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संस्था याना सायकली प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्राथमिक शिक्षिका विजयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी आश्रमशाळा शांतिवन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रत्नाकर केणी, राऊत अंजली, दिपीका गायकवाड, गोसावी राजेंद्र, मदन गायकवाड, रमेश मुरे, ललिता तातरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रिया रोडपालकर, अनुज रोडपालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, सचिव मयुर तांबडे, सहसचिव बाळाराम रोडपालकर, खजिनदार विशाल सावंत, सदस्य एड. नागेश हिरवे, हरेश साठे, रोहन गावंड, दीपक जगे, वसंत जाधव, राज भंडारी यांनी विशेष मेहनत घेतली. यापुढे देखील गरजू नागरिकांना सायकली वाटप करण्यात येणार आहेत, ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे आणि गरजूना मदत करावयाची आहे, त्यांनी एड. मनोहर सचदेव 7276666666, मयुर तांबडे 9323935050, डॉ. कृष्णा  देसाई 9372635443, बाळाराम रोडपालकर 9920594133, एड.नागेश हिरवे 7977472851 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image