भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी



पनवेल(प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार पनवेलमध्ये दुमदुमला होता. 
पनवेल बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, महिला व बाल सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पनवेल भाजपच्यावतीने नागरिकांसाठी ताक व सरबतचे मोफत वाटप करण्यात आले होते. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गटातील भव्य निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image