लोन करता घेतलेले पैसे परत न दिल्याने गुन्हा दाखल

 लोन करता घेतलेले पैसे परत न दिल्याने गुन्हा दाखल 

नवीन पनवेल : होम लोन करून देण्यासाठी घेतलेले पैसे परत न दिल्या प्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
          रोडपाली येथील साधना प्रदीप जैस्वाल त्यांची मुलगी आरुषी ही हीमकर रणजीत सिंग यांच्या ऑफिसला गेली. यावेळी लोनसाठी डॉक्युमेंट देण्यात आले. त्यानंतर साठ लाख रुपयांचे होम लोन मिळण्यासाठी त्यांनी 2 ते 3 बँकेत प्रपोजल टाकले. त्यासाठी दोन टक्के कमिशन द्यावे लागेल असे सांगण्यात आले. त्यातील अर्धे पैसे आत्ता द्यावे लागतील असे सांगून तीस हजार 900 रुपये हिमकर सिंग याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. एकूण 56 हजार 600 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र  हीमकर यांनी होम लोनचे काम केले नाही. त्यामुळे दिलेले पैसे व डॉक्युमेंट परत मागितले असता वीस हजार रुपये परत करण्यात आले. व 36 हजार सहाशे रुपये परत न केल्याने हिमकर याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गळ्याला सुरा लावून 24 हजार 600 रुपये केले लंपास
नवीन पनवेल : भंगाराच्या दुकानात घुसून दोन अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व गळ्याला सुरा लावून 24 वर्ष तरुणाच्या खिशातून 24 हजार 600 रुपये लंपास केल्याची घटना कोळखे येथे घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           पेठ गाव येथील आताऊल्ला अब्दुल खान याचा कोळखे गाव महिंद्रा शोरूमच्या समोर जुना मुंबई पुणे हायवेच्या बाजूला पनवेल येथे भंगार खरेदी विक्री करण्याचे दुकान आहे. ते जेवण बनवत असताना एक्टिवा स्कूटी वरून दोन अनोळखी इसम त्याच्या दुकानात घुसले व पैशांची मागणी केली. त्याने नकार दिला असता त्याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमिनीवर पाडून पोटावर पाय ठेवले व गळ्याला सुरा लावला. व दुसऱ्या अनोळखी इसमाने त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात टाकून 24 हजार 600 रुपये काढून घेतले. त्यानंतर ते एक्टिवा स्कुटी वरून पळून गेले. यावेळी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक त्यांच्यामागे धावू लागले. मात्र ते पळून गेले. हे दोन्ही अनोळखी इसम पंचवीस ते तीस वर्षे वयोगटातील आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


--


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image