पनवेलमधील प्रख्यात समाजसेविका, पत्रकार सौ. रूपालीताई शिंदे यांचा "सावित्रीची लेक " या पुरस्काराने सन्मान..

पनवेलमधील प्रख्यात समाजसेविका, पत्रकार सौ. रूपालीताई शिंदे यांचा "सावित्रीची लेक " या पुरस्काराने सन्मान..


कोपरखैरणे (नवीमुंबई ) : संतशिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळ्याचे कोपरखैरणे से. 14 शेतकरी हॉल याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेलमधील प्रख्यात समाजसेविका, पत्रकार सौ. रूपालीताई शिंदे यांना  "सावित्रीची लेक " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. "सावित्रीची लेक सन्मानचिन्ह, महात्मा ज्योतीराव फुले यांचे पुस्तकं आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान अखिल भारतीय महात्मा फुले समता परीष नवीमुंबई अध्यक्ष किरण झोडगे व जेष्ठ समाजसेवकांसह, नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान स्वीकारताना रुपालीताई शिंदे यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त केले. तसेच यावेळी या सोहळ्यानिमित्त ऐरोली मतदार संघ नवीमुंबई आमदार मा. संदीप नाईक, माण. खटाव मतदार संघ आमदार मा. जयकुमार गोरे( भाऊ ), यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी विविध मान्यवरांना सावित्री मातृत्व स्विकार, सावित्री लेकीचा सत्कार, समाजभूषण पुरस्कार, बेस्ट गारडीयन अश्या विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सोहळ्याला उपस्थित मान्यवर बाळासाहेब करडक प्रदेश उपाध्यक्ष, अ भा म फुले समता परीषद नवीमुंबई अध्यक्ष किरण झोडगे, नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, सम्मनवयक अनिल नळे नाशिक, म ना पालिका विरोधीपक्ष नेत्या कविताताई करडक, विरोधीपक्ष नेता दिलीप घोडेकर, रामदास शेठ डोके, फुलन शिंदे महीला अध्यक्षा,  डाँ प्रकाश ढोकणे, डाँ श्रीकृष्णा ढोणे, क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष सौ. रुपालीताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सावतामाळी मित्र मंडळाच्या सदस्य राजेंद्र कर्णे, पोपट राऊत, के आर चौधरी, ज्ञानेश्वर महाजण, रणजित घनवट, वामन गार्डै, अविनाश भुजबळ, चंद्रकांत चवरे, अकुंश ननावरे, क्रांतिलाल बनकर, विजय बोराटे,सौ. हेमलता क्षिरसागर, सौ. ललिता राऊत आदींनी परीश्रम घेतले.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image