हनुमान स्तोत्र काणी पडताच अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत हनुमंताच्या दर्शनाला

हनुमान स्तोत्र काणी पडताच अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत हनुमंताच्या दर्शनाला


पनवेल, ता.16 - हनुमान जन्मोतसवाचे औचित्य साधून कळंबोली वसाहती मधील मंदिरात आयोजित कार्यक्रमात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी अचानक भेट दिल्याने जन्मोत्सव साजरा करणाऱ्या आयोजकाणा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सुखद धक्का मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी ( ता.16 ) कर्जत येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याना प्रमुख पाहुणे म्हणून मनसे चे युवा नेते अमित ठाकरे हे आपल्या ताफ्या सहित सायन - पनवेल महामार्गावरून निघाले होते या वेळी ते काही काळ कळंबोली येथील मॅक्डोनाल्ड हॉटेल येथे थांबले असता मॅक्डोनाल्ड हॉटेल परिसरातील घरकुल या रहिवाशी संस्थेत असणाऱ्या मारुती मंदिरात हनुमंताचा जन्मोत्सव साजरा होत असल्याचे अमित यांच्या लक्षात आले. अमित यांनी तात्काळ कळंबोली शहराचे माजी शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्याकडे या बाबत विचारणा करत, मंदिरात सुरु असलेल्या जन्मोतस्वात सामील होण्याची इच्छा दर्शवल्याने काही मिनिटातच माजी शहर प्रमुख चव्हाण यांच्या सोबत अमित ठाकरे जन्मोत्सव साजरा होत असलेल्या मंदिरात उपस्थित झाल्याने मंदिरात उपस्तित भक्तांनी ठाकरे यांचे स्वागत केले आहे.

Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image