तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरीविरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश  



पनवेल : पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा १९ एप्रिल रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी मागणी केलेल्या तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठी मंजूरी मिळाली. तसेच अग्निशमन दलासाठी 15 कोटी रुपयांची वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे.

          पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेस 1, सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक आठ/ नऊ येथे सिडको प्राधिकरणामार्फत सुसज्ज दफनभूमी तयार करण्यात आली आहे. पालिकेने सिडकोसोबत हस्तांतरणाची कार्यवाही केली नसल्याने कब्रस्तान दफन विधी करता खुले करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना दफन विधी करता पनवेलखारघर , मुंबई येथे जावे लागते त्यामुळे कुटुंबीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तळोजा येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान हस्तांतरित करून दफन विधी खुली करण्यासाठीची मागणी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील यानी केली होती. या मागणीला सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली आहे. तसेच  अग्निशमन दलासाठी 15 कोटिंची वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. एकूण 110 चौरस किलोमीटर इतके कार्यक्षेत्र असलेल्या पनवेल महानगरपालिका अग्निशामक विभागामार्फत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे बचाव कार्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले फायरफाईटींग वाहने असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मल्टीपर्पज फायर इंजिनरॅपिड इंटर्वेंशन व्हीकलमल्टीपर्पज टर्न टेबल लँडरवॉटर टँकर ही पाच वाहने पनवेल पालिका खरेदी करणार आहे. नगरसेवक सतीश पाटीलडॉ सुरेखा मोहोकर यांच्यासह महाविकास आघाडीने विशेष प्रयत्न करून कब्रस्तान हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. कब्रस्तान आणि अग्निशामक दलासाठी वाहन खरेदी करण्यासाठी मंजूरी मिळाल्याबाबत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेवक सतीश पाटील आणि महाविकास आघाडीने आयुक्त गणेश देशमुख, प्रशासन यांचे आभार मानले आहेत.

 

          कामोठेखांदा कॉलनी , तळोजेग्रामीण भाग येथे फायर स्टेशन उभारणे.तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना जॅकीटगंबूटग्लोज पुरवावेत, आणि खेडेगावात आग विझविण्यासाठी छोटे पिकअप खरेदी करुन विमा कवचाचे संरक्षण देणे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे.

 

 बऱ्याच वर्षांपासून रखडलेला प्रश्न तळोजा येथील मुस्लिम बांधवांच्या एकजुटीने आणि पाठपुराव्याने आज मार्गी लागला आहे- प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल पालिका 

 

 दफ़नभूमित पालिकेचे कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. विषय मार्गी लागल्याबद्दल आयुक्त, प्रशासन यांचे आभार मानते :- डॉ सुरेखा मोहोकर, नगरसेविका 


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image