अज्ञात त्रिकूटाने गॅस टॅंकर चालकाला मारहाण करून लुटले

 अज्ञात त्रिकूटाने गॅस टॅंकर चालकाला मारहाण करून लुटले 


पनवेल दि.२३ (संजय कदम) : अद्यात अज्ञात त्रिकूटाने गॅस टॅंकर चालकाला मारहाणकडून लुटल्याची घटना पनवेलजवळील मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर पुणे लेन किमी ९/८०० येथे घडली आहे. 

      गॅस टॅंकर चालक साजिद कयूम अंसारी (वय ३०) हा त्याच्या ताब्यातील गॅस टँकर क्र. एम.एच. १२ एन एक्स ८८८१ ने मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे येथे जात असताना किमी ९/८०० येथे तेथे वाहन आले असता अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या टीशर्ट व हाफ पॅन्ट घातलेल्या दोन इसमाने त्याची गाडी अडवून गाडीत चढून त्याला जबरदस्तीने खाली खेचून त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या अंधारातून आलेल्या तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या जीन्स पॅन्ट- टीशर्ट घातलेल्या एका इसमाने त्याच्या कपाळावर लाकडी काठीने मारून त्याला जखमी करून इतर दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल व टीशर्टच्या खिशातील रोख रक्कम रुपये ७००० जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते तिघे जण अंधारात पळून गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image