पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ढोरोशी ग्रामपंचायतीची निवड

पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ढोरोशी ग्रामपंचायतीची निवड       


                  सातारा (प्रतिनिधी)-राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२(पडताळणी वर्ष २०२०-२१)केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा हा ग्रामपंचायत विभागातील सर्वोच्छ मानाचा पुरस्कार महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये असणाऱ्या ढोरोशी ग्रामपंचायतीला मीळाला आहे. 

      दि.२४ एप्रिल २०२२ रोजी मा.पंतप्रधान, नरेंद्र मोदी  यांचे शुभहस्ते नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सत्तावीस हजार ग्रामपंचायतीमधून फक्त सतरा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.त्या सतरा पैकी ढोरोशी ही एक ग्रामपंचायत आहे.              

       ढोरोशी ग्रामपंचायतीस हा पुरस्कार मिळविण्यासाठी पंचायत समिती पाटणच्या गट विकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,श्री.वाघ,श्री. कुंभार साहेब-विस्तार अधिकारी पंचायत समिती पाटण, सर्व ग्रामस्थ ढोरोशी. ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी,जि.प.प्राथमिक शाळा,माध्यमिक विद्यालय ढोरोशीचे सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा स्वयंसेविका,अरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी या सर्वाचे मोलाचे योगदान लाभले आहे.तसेच नोकरी- व्यवसायानिमित्त्त गावाबाहेर पुणे-मुंबईला वास्तव्यास असणारे आणि भारतीय सैन्य दलातून सरहद्दीवरती सेवा देणाऱ्या अनेक नागरिकांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्यामुळे हे यश संपादीत करता आल्याचे ढोरोशी गावच्या सरपंच सौ.नलिनी महेंद्र मगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “सरदार @१५० एकता पदयात्रा”
Image
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या दर्जेदा पुस्तकाच्या यादीत लेखिका सौ.अरुणा अजित भागवत यांच्या दोन पुस्तकांची निवड
Image