नवीन पनवेलमध्ये पुलाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुविधा

नवीन पनवेलमध्ये पुलाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुविधा



पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी प्रयत्नांमुळे नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी  झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहा, असे प्रतिपादन केले.
         भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांमार्फत नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ असलेल्या नाल्यामुळे या ठिकाणाहून जाणार्‍या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता. पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
      यावेळी नगरसेवक राजू सोनी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, डीएव्ही स्कूलच्या मुख्याध्यापिका चैतन्या रेड्डी,  जितेंद्र तिवारी, अक्षय सिंग, शोभा सातपुते, कुलबीर चंडोक, आशा शेट्टी, विठाबाई सावंत, आर.पी. पाटील, 
शिवाजी भगत, देवेंद्र परब, श्याम शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image