सामाजिक कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मते-पाटील कुटुंबियांचे कौतुक

सामाजिक कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मते-पाटील कुटुंबियांचे कौतुक 



पनवेल(प्रतिनिधी) शिवकर येथील मते-पाटील कुटुंबियांच्या वतीने गावामध्ये करण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. 
            पनवेल तालुकयातील शिवकर गावातील मते- पाटील कुटुंबीयांनी सन २०१७ ते २०२१ पर्यत विविध सामाजिक उपक्रमे राबवली आहेत. त्याची माहिती अमित पाटील, संतोष मते, चिंतामण पाटील, मछिंद्र मते आदी मते- पाटील कुटुंबियांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सोमवारी (दि. २८) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन दिली. या सामाजिक कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मते-पाटील कुटुंबियांना विशेष पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. अमित धर्मा पाटील यांचे वाढदिवस तसेच इतर औचित्य साधून शिवकर गावात विविध कार्यक्रमे आयोजित केले जातात. त्यामध्ये आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त गणपती विसर्जन घाट लगतचे नदी पात्र स्वच्छ करण्यात आले. स्मशानभूमीची स्वछता, दिव्यांगांना जिल्हा रुग्नालयाकडून प्रमाणपत्र, स्मशानभूमीचा चौथरा काँक्रीटीकरण, महामार्गाजवळ स्वछता, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शौषखड्डे, एनएसएस शिबीर, लोकसभागतून वृक्षारोपण, कब्रस्थान स्वछता, ग्राम स्वच्छता अभियान, गावात सीसीटीव्ही व अंडरग्राउंड केबल आणि ग्रामपंचायतीला एलईडी स्क्रीन दिली आहे असे विविध समाजोपयोगी उपक्रम मते- पाटील यांनी राबविले आहेत. 
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image