माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेला सदस्यांचा सत्कार

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेला सदस्यांचा सत्कार




उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हाधिकारी यांनी उरण तालुक्यातील विविध शासकीय समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये शिवसेनेच्या महिला तालुका संघटिका भावना कैलास म्हात्रे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिवसेना उरण शहराचे कासमभाट विभागाचे गटप्रमुख  उमेश मारुती भंडारी यांची उरण तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेला या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी जिल्हाप्रमुख  दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुका संघटक  बी एन डाकी,गटनेता गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, उरण शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक  निलेश भोईर, महिला आघाडी पदाधिकारी श्रीमती सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, श्रीमती वंदना पवार, रझिया शेख, हुसेना शेख, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, सायरा खान, संजना कोष्टी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image